‘विठुमाऊली’ या मालिकेचे ५०० भाग पूर्ण

‘विठुमाऊली’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. या मालिकेचे नुकतेच ५०० भाग पूर्ण झाले. मालिकेत सध्या विठुरायाच्या मंदिराच्या उभारणीचा नयनरम्य प्रवास पाहायला मिळतोय. विठ्ठलाचा लाडका भक्त पुंडलिकाने हे पवित्र काम हाती घेतलंय.
पुंडलिकाच्या या प्रवासात बरेच अडथळेही आहेत. पुंडलिकाचं मंदिर उभारण्याचं हे कार्य पूर्ण होऊ नये म्हणून कलीचेही प्रयत्न सुरु आहेत. या अडथळ्यांवर मात करत पुंडलिक मंदिराची उभारणी कशी करणार? याचा रंजक प्रवास ‘विठुमाऊली’च्या यापुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
१२ बलुतेदारांच्या विराट दर्शनानंतर विठुराया कलीचा नाश कसा करणार याची गोष्ट येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.