‘वाघिण मुंबईला येतेय दम असेल तर अडवून दाखवा’

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा, अशा शब्दात कंगना राणौतने ट्विटरवरुन आव्हान दिले आहे. तिच्या या आव्हानानंतर भाजपात प्रवेश केलेल्या दंगल गर्ल बबिता फोगाटनं तिला वाघिण असं म्हणून खुलं चॅलेंज दिलं.

“मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा”, असा एल्गार कंगनाने केला.

कंगनाचं ट्विट रिट्विट करून बबिता म्हणाली की,”9 सप्टेबंरला वाघिण मुंबईत येतेय, कुणात हिम्मत असेल तर अडवून दाखवा. ती वेळही लवकरच सांगेल.”

 

You might also like