कॉमेडी किंग ब्रम्हानंदम यांची प्रकृती गंभीर

दाक्षिण चित्रपटाचे कॉमेडी किंग ब्रम्हानंदम यांची प्रकृती गंभीर आहे. हृदयरोगामुळे त्यांची सर्जरी करण्यात आली आहे. त्यांना मुंबईच्या एशियन हार्ट इंस्टीट्यूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

डॉक्टरांनी सांगितले की, ब्रम्हानंदम यांची प्रकृती अजून गंभीर आहे. यामुळे त्यांना ऑब्जर्वेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. डॉ. रमाकांत पांडा यांनी त्यांची सर्जरी केली. सोशल मीडियावर ब्रम्हानंदम यांना रुग्णालयात दाखल करण्याचे वृत्त येताच त्यांच्यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.