चिरंजीवी यांच्या फार्महाऊसला लागली भीषण आग

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांच्या फार्महाऊसला शुक्रवारी भीषण लागली. या आगीत ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ चित्रपटाच्या सेटचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

हैदराबादमधील कोकपेट गावात चिरंजीवी यांचा फार्महाऊस आहे. याच फार्महाऊसच्या परिसरात चिरंजीवी यांच्या आगामी चित्रपटाचा सेट उभारण्यात आला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. सुदैवाने सेटवर कोणीच उपस्थित नसल्याने जीवितहानी झाली नाही. शुक्रवारी बिग बी येथे शूटिंग करणार होते. मात्र आगीच्या घटनेमुळे शूटिंग पुढे ढकलण्यात आली आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.