छोट्या रमाबाईंची भूमिका साकारणार ‘ही’ बालकलाकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
या कुटुंबात लवकरच नव्या सदस्याची भर पडणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत लवकरच छोट्या रमाची एण्ट्री होणार आहे. मृण्मयी सुपल बालपणीच्या रमाची भूमिका साकारणार आहे. रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारणं तिच्यासाठी नवं आव्हान असणार आहे.
रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, आंदोलनं असो वा सत्याग्रह रमाबाई त्यांच्यापाठीशी सावली प्रमाणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी कुटुंबही सांभाळलं.