‘ठाकरे’ चित्रपटामधील ‘त्या’ डायलॉगमध्ये बदल….!

‘ठाकरे’ चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार असून हा चित्रपट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटातील ‘हटाव लुंगी’ या शब्दावर आधारित डायलॉगवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. या शब्दामुळे दक्षिण भारतीयांच्या भावना दुखावतील, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे निर्मात्यांनी या शब्दाऐवजी दुसरे शब्द वापरले आहेत. चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकू नये, यासाठी निर्मात्यांनी ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी दाक्षिणात्यांविरोधात आंदोलन हाती घेतले होते. त्या वेळी ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ अशी घोषणा शिवसेनेने केली होती.यामुळे दक्षिण भारतीयांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात त्यामुळे चित्रपटातून ‘हटाव लुंगी’ शब्द काढून, त्याऐवजी ‘उठाव लुंगी’ असे शब्द वापरण्याची तयारी निर्मात्यांनी दर्शविली. २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like