‘breathe in to the shadows’चा टीझर प्रदर्शित

चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिषेक बच्चन लवकरच ‘breathe in to the shadows’ या वेबसीरिजच्या माध्यमातून वेब विश्वात पदार्पण करत आहे. आता या सीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अॅमेझॉन प्राइमवर ‘breathe in to the shadows’ ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. त्यातच अलिकडे प्रदर्शित झालेला टीझर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

या टीझरमधून अभिनेत्री निथ्या मेनन हिचा लूकही प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर अभिषेकने सोशल मीडियावर शेअर केला आहे. “सगळं काही सुरुळीत सुरु होतं..पण अचानक एकदिवस सगळं काही बदलून गेलं. तुम्हाला माहित आहे का आमची सिया कुठे आहे”?, असं कॅप्शन अभिषेकने या व्हिडीओला दिलं आहे.

सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर असलेली ही सीरिज येत्या १० जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये अभिषेक बच्चनसह अभिनेता अमित साध, सयामी खेर आणि निथ्या मेनन देखील झळकणार आहे.

You might also like