सारा अली खानच्या लोकप्रियतेमुळे बोनी कपूर चिंतेत

सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोघींनी २०१८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या दोघींनी चाहत्यांची मन जिंकली. तसेच खासगी आयुष्यात देखील सारा आणि जान्हवी एकमेकींच्या खूप जवळ आहेत. पण तुलनेत सारा अली खानला जान्हवीपेक्षा जास्त लोकप्रियता मिळाली.

सारा अली खान अगदी पहिल्याच सिनेमापासून प्रेक्षकांची आवडती बनली. असं वाटतं की, साराच्या तुलनेत जान्हवी कपूर कुठे तरी मागे पडली आहे. करण जोहरच्या ‘धडक’ या सिनेमातून जानवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तर पण तिला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही.

बोनी कपूर या गोष्टीमुळे चिंतेत आहेत की, त्यांची मुलगी जान्हवी कपूर लोकांमध्ये तशी लोकप्रियता मिळवू शकली नाही जेवढी लोकप्रियता सारा अली खानला मिळाली.या सगळ्यांचे खापर बोनी कपूर यांनी जान्हवीने हायर केलेल्या पीआर कंपनीवर फोडले आहे. श्रीदेवीच्या निधनानंतर दोन्ही मुलींची संपूर्ण जबाबदारी बोनी कपूर यांच्यावर आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like