‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटात ‘या’ नावाजलेल्या अभिनेत्याची वर्णी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या चित्रपटामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार आहे. विवेकनंतर या चित्रपटामध्ये बोमण इराणी यांची वर्णी लागली आहे.
या चित्रपटामध्ये बोमण इराणी यांची मुख्य भूमिका असेल असं सांगण्यात येत असून ते नक्की कोणती भूमिका वठविणार आहेत हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.
‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचं गुजरातसह देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण करण्यात येणार असून या चित्रपटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चहाविक्रेता ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास दाखविण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ‘ठाकरे’साठी नवाजुद्दीन नाही तर ‘हा’अभिनेता होता पहिली पसंती
- पायरसीने रोखली ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चित्रपटाची वाट….!
- ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये दिशा वकानीच राहाणार दयाबेन
- आलियाच्या ‘या’ गोष्टी मुळे रणबीर वैतागला?