बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग याचा आज वाढदिवस 

बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग याचा आज वाढदिवस. 6 जुलै 1985मध्ये जन्मलेल्या रणवीरचे खरे नाव रणवीर सिंग भवनानी आहे. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर रणवीरने आपल्या नावासमोर भवनानी हे सरनेम लिहिणे बंद केले. खरे तर रणवीरला त्याचे नावही बदलायचे होते. कारण रणवीर हे रणबीरसारखे साऊंड करते, असे त्याला वाटायचे. पण नंतर त्याने हा निर्णय बदलला.

रणवीर मध्ये लहानपणापासूनच एक अभिनेता बनायची इच्छा मनात बाळगायची त्यासाठी त्याने शाळेत, महाविद्यालयात अभिनय आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घायला सुरवात केली नंतर एच आर कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स, मुंबई मध्ये प्रवेशानंतर त्यांना कळून चुकले कि चित्रपटामध्ये काम करणे इतके सोपे नाही. अनेक लोक त्याला , त्यांच्या परिवाराला फिल्म इंडस्ट्रीशी जुळलेले नसल्याने यश मिळू शकत नाही. असा सल्ला द्यायचे. तरीही मनात अभिनयाची प्रबल इच्छा होती.

बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी रणवीरला बराच संघर्ष करावा लागला. अगदी थिएटरमध्ये बॅकस्टेजवर  कलाकारांसाठी चहा आणण्यापासून तर त्यांच्यासाठी खुर्च्या लावण्यापर्यंतचे पडेल ते काम त्याने केले. पण 2010 मध्ये आदित्य चोप्राने रणवीरला ब्रेक दिला आणि रणवीरचा पहिलाच चित्रपट ‘बँड बाजा बारात’ सुपरहिट झाला. यानंतर रणवीरने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्या नंतर रणवीरने बॅक तो बॅक अनेक चित्रपट दिले आणि प्रेक्षकांनीही त्याच्या चित्रपटाला खूप पसंद दिली. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०१३ ला रणवीर आणि दीपिका चा रामलीला हा चित्रपट प्रदर्शित झाली आणि तेव्ह दोघेही प्रेमात पडले आणि जवळपास ५ वर्षीनी त्यांनी लग्नगाठ बांधिली . १४ नोव्हेंबर २०१८ साली त्यांनी लग्न केले.

You might also like