बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते राजकुमार बडजात्या यांचे निधन

राजश्री फिल्मचे संस्थापक आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते राजकुमार बडजात्या यांचे आज (गुरुवारी) सकाळी निधन झालं. मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रूग्णालयात त्यांनी अखरेचा श्वास घेतला.

गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे  त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा बडजात्या आणि मुलगा सूरज बडजात्या असा परिवार आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट  कोमल नहता यांनी आपल्या ट्विटर  अकाऊंटवर राजकुमार यांच्या निधनाची बातमी शेअर केली.

राजकुमार बडजात्या यांच्या राजश्री प्रॉडक्शनने एकापेक्षा एक दमदार चित्रपटांची निर्मिती केली. ‘पिया का घर’, ’हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘विवाह’ असे अनेक चित्रपट राजश्री प्रॉडक्शनने दिले आहेत. गेल्या १५ फेबु्रवारीला राजकुमार यांची निर्मिती असलेल ‘हम चार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

महत्वाच्या बातम्या –