सुशांतच्या मृत्यूसाठी बॉलिवूड जबाबदार नाही- विद्या बालन

अभिनेता सुशांत सिंहने 14 जूनला आपल्या राहत्याा घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या अशा अचानक जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसला. सुशांतच्या मुत्युला बॉलिवूडमधील काही कलाकार आणि घराणेशाही जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. यावर प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांतचा मृत्यु ही एक  दुदैवी घटना आहे. मात्र यामध्ये बॉलिवूडला दोषी धरणं योग्य नाही. कदाचित बॉलिवूडचा काही दोषही असू शकत नाही. सुशांतसोबक नक्की काय घडलं?, त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला?, याबाबत आपल्याला माहित नाही. पोलीस त्या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारावर कोणावरही आरोप करू नयेत, असं विदया बालनने म्हटलं आहे.

विद्या बालन लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव शकुंतला देवी असं आहे. ‘ह्युमन कॉम्प्युटर’ असा लौकिक मिळवणाऱ्या गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

You might also like