थुकरट वाडीत येऊन बॉलिवूडचे कलाकार करणार विक्रांत-ईशाच्या लग्नाचा निषेध

प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला गाठला.आता या कार्यक्रमात नवीन काय असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला असताना नुकतंच चला हवा येऊ द्या चे नवीन पर्व होउ दे व्हायरल प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे.

येत्या भागात थुकरटवाडीत सुबोध भावे आणि सई ताम्हणकर येणार आहेत. सुबोध भावे त्याचा आगामी चित्रपट ‘एक निर्णय’ आणि सई तिच्या झी फाईव्ह ‘वरील डेट विथ सई’ या वेबसिरीजच्या निमित्ताने थुकरट वाडीत सज्ज होणार आहे.

विक्रांत आणि ईशा यांचं शाही लग्न हा चर्चेचा विषय होता आणि त्या लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटीजना बोलावलं नाही म्हणून बॉलिवूडच्या कलाकारांनी निषेध व्यक्त करणार आहेत. सर्व बॉलिवूडचे कलाकार थुकरटवाडीत ‘माझा वट्टा’ या कार्यक्रमात येणार आहेत.त्यामुळे ही सर्व धमाल पाहायला विसरू नका १४ आणि १५ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर!!!

महत्वाच्या बातम्या –

You might also like