‘ब्लॅक पँथर’ फेम चैडविक बोसमैनचे निधन

मार्वल स्टुडिओ फिल्म ‘ब्लॅक पँथर’ चित्रपटातील मुख्य अभिनेता ‘चाडविक बोसमन’ याचे  निधन झाले आहे. चॅडविकने वयाच्या 43 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेतील लॉस एंजलिस इथे त्याचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी चाडविक बोसमन चे सर्व कुटुंब त्याच्यासोबत होते.

चाडविक बोसमन गेले 4 वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होता. चॅडविकने त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या. मात्र, 2018 साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्लॅक पँथर’ या चित्रपटाने त्याला यशाच्या उच्च शिखरावर पोहोचवले.

मार्व्हल युनिव्हर्समधला चाडविक बोसमन हा पहिला कृष्णवर्णीय सुपरहिरो होता. त्याच्या ‘ब्लॅक पँथर’ चित्रपटाला ऑस्कर या मानाच्या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले.

 

You might also like