सुशांतला न्याय मिळेपर्यंत भाजप गप्प बसणार नाही – देवेंद्र फडणवीस

सुशांतसिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी सामान्य माणसाची भावना बिहार निवडणुकीत मांडणार असे बिहार भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पाटण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. सुशांतला न्याय मिळणार नाही, तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही असे सांगताना, बिहार भाजपच्या सुशांत पोस्टरची जबाबदारीही फडणवीस यांनी घेतली.

दरम्यान, सुशांत मृत्यू प्रकरणातल्या ड्रग्ज कनेक्शनच्या तपासाने वेग घेतला आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर रियाने बॉलिवूडचा खरा चेहरा समोर आणला आहे. रियाने दिलेल्या २५ बॉलिवूडकरांच्या यादीत एनसीबीच्या रडारवर सुरुवातीला ५ जण असल्याची माहिती मिळत आहे.

या चौकशीमध्ये रियाने २५ बड्या कलाकारांची नावं घेतली होती. यात सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांचा समावेश असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. रियाला अटक करण्यापूर्वी एनसीबीने तिची चौकशी केली होती. या चौकशीमध्ये तिने बॉलिवूडमध्ये चालणाऱ्या ड्रग्स पार्ट्यांविषयी काही खुलासे केले होते. तसंच २५ बड्या कलाकारांची नावंदेखील घेतली होती.

यामध्येच आता सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायन सिमोन खंबाटा यांची नावं समोर आली आहे. त्यामुळे एनसीबी आता या तिघींविरोधात पुरावे गोळा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:-

You might also like