मराठी कलाकारांची खिल्ली उडवल्याने भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ ट्रोल

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी सोशल मीडियावर एका पोस्टवर कमेंट करत मराठी कलाकारांची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही यूजर्सने त्यांना सुनावले आहे तर काहींनी त्यांना पाठींबा दिल्याचे चित्र दिसून येत आहे.
वाघ यांनी कंगना रणौतशी संबंधीत एका पोस्टवर कमेंट करत मराठी कलाकारांची खिल्ली उडवली आहे. या पोस्टमध्ये कंगना एखादा चित्रपट किंवा जाहिरातींसाठी घेत असलेले मानधन आणि मराठी अभिनेत्री एका चित्रपटासाठी व मालिकेसाठी घेत असलेल्या मानधनातील फरक आधोरेखीत करण्यात आला आहे. या पोस्टवर प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मराठी कलाकारांना उद्देशून कमेंट केली आहे.
या कमेंटमध्ये त्यांनी ‘स्कूटी घेतली की सेल्फी काढतात आणि डोंबिवली चर्चगेटचा फर्स्ट क्लासचा पास स्टेटस ठेवतात’ असे म्हटले आहे. त्यांच्या या कमेंटमुळे त्यांना सोशल मीडियावर काहींनी ट्रोल केले आहे तर काहींनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी अवधूत वाघ यांच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत ही अतिशय निंदनीय बाब आहे असे म्हटले आहे. ‘मराठी कलाकारांबद्दल असे वक्तव्य करणारे हे भाजप अधिकृत प्रवक्ते आहेत! अतिशय निंदनीय बाब आहे! मतांच्या लालसेपायी हे किती महाराष्ट्र द्रोही होणार ??? मराठी कलाकारांवर इतका राग का तर त्यांनी मुंबईवर अभिमान व प्रेम व्यक्त केले.. हे भाजप ला का झोम्बले ?’ असे त्यांनी म्हटले आहे.
मराठी कलाकारांबद्दल असे वक्तव्य करणारे हे भाजप अधिकृत प्रवक्ते आहेत!
अतिशय निंदनीय बाब आहे!मतांच्या लालसेपायी हे किती महाराष्ट्र द्रोही होणार ???
मराठी कलाकारांवर इतका राग का तर त्यांनी मुंबई वर अभिमान व प्रेम व्यक्त केले..
हे भाजप ला का झोम्बले ? pic.twitter.com/GqTSJkC3cZ— Varun Sardesai (@SardesaiVarun) September 11, 2020
महत्वाच्या बातम्या:-