कोणाच्याही धार्मिक भावणा दुखावणे योग्य नाही ; पण मग हिंदू धर्माच्या बाबतीत दुटप्पी का ?

‘महंमद द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारण बंदीसाठी रजा अकादमी या संस्थेने राज्याच्या सायबर विभागाकडे तक्रार अर्ज केला आहे. यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार चित्रपट प्रसारणावर बंदी घालावी, असे पत्र केंद्र शासनास पाठविले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.यावर भाजप नेते आमदार राम कदम यांनी महाराष्ट्र देशाला प्रतिक्रिया दिली आहे.
कदम म्हणाले ‘कोणत्याही जाती – धर्माच्या किंवा पंथ संप्रदायाच्या भावभावनांचा दुखवणाऱ्या त्यांच्या श्रद्धा, निष्टेला ठेच पोहोचवणारी वेब सिरीज असेल,चित्रपट असेल यावर बंदी आणलीच पाहिजे.आणि या कामी महाराष्ट्र राज्य सरकार प्रयत्न करत असेल तर त्याला काही विरोधच नाही.पण महाराष्ट्र सरकारला दुटप्पी भूमिका घेता येणार नाही. कारण आजही हिंदू धर्माच्या श्रध्देला ठेच पोहोचणारी ‘ कृष्णन लीला ‘ सारखी सिरीज नेटफ्लिकस वर आहे मग त्यावर कारवाई का नाही.म्हणजे एका विशिष्ट जाती – धर्माप्रती एवढी आस्था आणि दुसऱ्या प्रती एवढा तिरस्कार का ? असा प्रश्न देखील कदमांनी विचारला आहे.तसेच सरकारने कारवाई करायची असेल तर दुटप्पी भूमिका घेत कारवाई करू नये असा सल्ला देखील कदमांनी दिला आहे.
सदर चित्रपटाचे प्रसारण २१ जुलै रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, परंतु त्यावर बंदी घालावी असे विनंतीपत्र रजा अकादमीने राज्याच्या सायबर विभागास पाठविले होते. त्यास अनुसरून केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाला पत्र पाठवून या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारणावर बंदी घालावी तसेच यु ट्यूब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सला सदर चित्रपट प्रसारित न करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी पत्रात केली आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाने देखील अशा प्रकारची विनंती सदर मंत्रालयाला केली आहे.राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता हे बंदी घालण्यासाठीचे विनंतीपत्र दिले असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
‘या’ चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारण बंदीसाठी केंद्र शासनास पत्र