त्यांना बुडाखाली आग लागल्यावर ‘मराठी अस्मिता’ आठवते

सद्या ट्विटरसह प्रत्यक्षात देखील सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी तपासावरून सुरु झालेला हा वाद आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाला दिलेल्या इशाऱ्यानंतर मराठी-अमराठी होऊ लागला आहे. यानंतर,राज्यभरातून कंगनाच्या विरोधात तसेच काही प्रमाणात समर्थनार्थ भूमिका देखील मांडल्या जात आहेत.
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेच्या या भूमिकेवरून निशाणा साधला आहे. “बुडा खाली आग लागल्यावर मराठी अस्मिता आठवते, बाकी सोनिया मातोश्रीच्या चरणी नाक रगडताना फक्त सत्ता आणि त्यातून मिळणारी टक्केवारी नजरे समोर असते. मै माफी चाहता हू (अनेक वेळा), इजाजत लेता हू… हे तर अगदीच ताजे आहे…” असे ट्वीट करत शिवसेेनेसह मुख्ययमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता खरमरीत टीका केली आहे.
दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाष्य केले असून, शिवसेना सद्याच्या उद्भवलेल्या प्रश्नावर गंभीर समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी काही किंमत नसलेल्या व्यक्तीच्या प्रसिद्धीसाठीच्या वक्तव्याच्या जाळ्यात मुद्दाम अडकत आहे असा आरोप केला आहे.
बुडा खाली आग लागल्यावर मराठी अस्मिता आठवते, बाकी सोनिया मातोश्रीच्या चरणी नाक रगडताना फक्त सत्ता आणि त्यातून मिळणारी टक्केवारी नजरे समोर असते.
मै माफी चाहता हू (अनेक वेळा), इजाजत लेता हू… हे तर अगदीच ताजे आहे…— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 4, 2020