‘बिग बॉस मराठी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त  शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस मराठी’चं तिसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बिग बॉसच्या घरात टास्क कसे रंगणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. बिग बॉसच्या घराच्या थीमविषयीसुद्धा उत्सुकता आहे.

बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व १५ एप्रिल २०१८ रोजी पार पडलं. या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजय ठरली. त्यानंतर दुसरं पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पर्वामध्ये शिव ठाकरेने ‘बिग बॉस मराठी 2’ ची ट्रॉफी जिंकली. हे दोन्ही पर्व प्रचंड गाजले.

आता प्रेक्षक तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत.तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालकसुद्धा महेश मांजरेकरच असतील का याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र दोन्ही पर्वातील त्यांचं सूत्रसंचालन प्रेक्षकांना व स्पर्धकांना फार आवडलं. त्यामुळे या तिसऱ्या पर्वातही त्यांचीच वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

You might also like