सुशांत सिंह राजपूतच्या नोकराचा मोठा खुलासा , म्हणाला रात्री…

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सतत नव नवीन खुलासे होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सुशांत याच्या नोकराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार रात्री कोणतीही पार्टी झालेली नाही. बिहार पोलिसांनी सुशांतच्या नोकराची चौकशी केली त्यावेळी त्याने स्पष्ट सांगितले, आत्महत्येच्या पहिल्या रात्री सुशांतच्या घरी कोणतीही पार्टी झालेली नाही.

सुशांतच्या नोकराने बिहार पोलिसांना सांगितले की, १३ जून रोजी रात्री जेवण करुन सुशांत त्याच्या बेडरुममध्येच होता. १४ जून रोजी सुशांतला दररोज प्रमाणे पहाटे उठला. त्या रात्री तो बाहेर गेला नाही ना घरी कुठली पार्टी झाली.

यापूर्वी मुंबई पोलिसांनीही पार्टी झाली नसल्याचे अधिकृतपणे नकारले होते. सुशांतच्या कॉल डिटेलवरून मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतने रात्री उशिरा दोन वाजताच्या सुमारास दोन फोन केले होते. रिया चक्रवर्ती आणि तिचा मित्र महेश शेट्टी यांना. मात्र, त्यांनी हे फोन कॉल उचलले नव्हते. त्यामुळे त्या रात्री दोघांशीही त्याचे संभाषण होऊ शकले नाही.

युवराज सिंगचे लग्नाआधी ‘या’ 5 बॉलिवूड अभिनेत्रींशी होते अफेयर 

You might also like