गौरी खानकडून शाहरुखबाबत मोठा खुलासा

९०च्या दशकातील ‘बाजीगर’ चित्रपट जबरदस्त गाजला. या चित्रपटातील ‘ये काली काली आंखे’ गाणंही चांगलंच सुपरहिट ठरलं होतं. आता शाहरुखची पत्नी गौरी खानने या चित्रपटाबाबत एक खुलासा केलाय. ‘बाजीगर’मधील ‘ये काली काली आंखे’ या गाण्यासाठी शाहरुखचा लूक इंटीरियर डिझायनर आणि पत्नी गौरी खानने डिझाइन केला होता.

‘मला विश्वास बसत नाही की मी ९०च्या दशकात, हँड प्रिंटेड जीन्स, लेगवार्मर टी, बुलेट बेल्ट आणि रेड शर्ट असा लूक डिझाइन केला होता.’ असं गौरी खानने ट्विट करत म्हटलंय.फोटोमध्ये शाहरुख प्रिंटेड जीन्ससह लाल रंगाच्या शर्टमध्ये दिसतोय. तर काजोल गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय.

 

You might also like