मोठी बातमी : अभिनेता संजय दत्तला झाला फुफ्फुसाचा कॅन्सर

श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं अभिनेता संजय दत्ताला 8 ऑगस्टला लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संजय दत्तचा श्वसनाचा त्रास लक्षात घेता त्याची कोरोना चाचणी करण्यात आली.कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं दत्त कुटूंबाला हायसं वाटलं. मात्र आता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चित्रपट व्यवसायाचे अभ्यासक कोमल नहाटा यांनी ट्विटरवरून संजय दत्तला कोरोना झाल्याची माहिती स्पष्ट केली आहे. नहाटा म्हणाले की, अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे. त्यांना पुढील उपचारासाठी अमेरिकेला घेऊन जाण्याचा विचार आहे.

रूग्णालयात दाखल केल्यावर संजय दत्तला नक्की काय झालंय. याची कसलीच कल्पना नव्हती. मात्र नहाटा यांच्या ट्विटनंतर संजय दत्तला कोरोना झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. संजय दत्तचा देखील काल ट्विट करत कामातून ब्रेक घेत असल्याचं ट्विट केलं होतं.

संजय दत्त म्हणाला की, ‘वैद्यकीय उपचारासाठी मी कामापासून काही काळ ब्रेक घेणार आहे. माझ्या चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी उगाच अफवा पसरवू नयेत. माझे कुटुंबीय माझ्या बरोबर आहेत. लवकरच परत येईन.’

 

You might also like