हात जोडून बिग बींनी मानले चाहत्यांचे आभार

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा १२ जुलै रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानंतर पाच दिवसांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक ऐश्वर्याची मुलगी आराध्या या दोघींनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दोघींची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली होती. सध्या ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीचे अपडेट्स चाहत्यांना मिळत आहेत. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट करुन चाहत्यांचे आभार मानले आहेत.

चाहत्यांचं प्रेम पाहून बिग बी भारावून गेले असून त्यांनी ट्विट करत सगळ्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी हात जोडून एक फोटो शेअर केला आहे. “या कठीण प्रसंगात तुम्ही माझ्यावर करत असलेलं प्रेम आणि माझ्यासाठी करत असलेली काळजी या सगळ्यातच माझा दिवस जात आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून शक्य होईल तसं सगळ्यांच्याच शुभेच्छा स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद”, असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

दरम्यान, बिग बींना करोनाची लागण झाल्याचं समजताच कलाविश्वात आणि चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याविषयीची काळजी व्यक्त केली होती. तर अनेक मंदिरांमध्ये त्यांच्यासाठी खास पूजा, अभिषेकदेखील करण्यात आला होता.

 

You might also like