‘लागिरं झालं जी’ मधल्या भैय्यासाहेबांनी लॉकडाऊन मध्ये उरकलं लग्न ?

झी मराठी वरील ‘लागिरं झालं जी’ मालिकेबरोबरच त्यातील पात्रही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहेत.लॉकडाऊनमध्येही ‘टोटल हुबलाक’ या धमाल विनोदी मालिकेतूनही लागिरंमधील काही पात्र पुन्हा भेटीला आली. लागीर झालं जी मालिकेतील भैय्यासाहेबाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता किरण गायकवाड मात्र सध्या वेगळ्याच कारणासाठी लाईमलाईटमध्ये आला आहे.

‘लागीरं झालं जी’ मालिकेत भय्या साहेब ही व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. देशात लॉकडाऊन सुरू असताना किरणनं लग्नाचा बार उडल्याचं म्हटलं जात आहे. त्यानं एक फोटो शेअर केलाय. त्यात तो अभिनेत्री मोनालिसा बागल हिच्यासोबत मुंडावळ्या बांधून उभा असल्याचं पाहायला मिळतंय.

काही दिवसांपूर्वी अभिनेता किरण गायकवाड अर्थात भैय्यासाहेब याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अभिनेत्री मोनालिसा बागलसोबतचा फोटो शेअर केला होता. त्या दोघांचा मुंडावळ्या बांधलेल्या आणि मोनालिसाच्या गळ्यात मंगळसूत्र असलेल्या फोटोने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला.

यानंतर भैय्यासाहेब आणि मोनालिसा बागल लग्नबेडीत अडकल्याच्या चर्चा सगळीकडे सुरू झाल्या. सगळीकडे त्यांच्या लग्नाच्या बातम्या यायला सुरवात झाली. एवढचं काय तर चाहते मालिकेबद्दल,अभिनयाबद्दल बोलताना त्यांच्या ‘पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा’ असे मेसेजेस देखील या कलाकारांना पाठवू लागले. मालिकेतील या दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांना दोघेही लग्नबेडीत अडकलेत याची खात्रीच पटत होती. या दोघांच्या जोडीमुळे ही मालिका प्रसिद्धीच्या शिखरावर होती. मात्र मर्यादीतच भागांसाठी ही मालिका असल्यामुळे काही दिवसातच टोटल हुबलाक मालिका संपून गेली. त्यामुळे या जोडीचे चाहते मात्र नाराज झाले.

मात्र खरचं भैय्यासाहेबने मोनालिसासोबत लग्न केलं? लॉकडाऊनमध्ये इतर कलाकारांप्रमाणे या दोघांनी लग्नाचा बार उडवला का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देताना भैय्यासाहेब म्हणतात की , “लग्न न होऊनसुद्धा मला आता लग्न झाल्यासारखं वाटतंय. मालिकेतील ‘तो’ फोटो शेअर करणं मला एवढं अशा पद्धतीने महागात पडेल याचा मी विचार सुद्धा केला नव्हता. मी आमच्या जोडीचा (अर्थातच मालिकेतील ! ) फोटो शेअर केल्यामुळे माझ्या Female Fans देखील नाराज झाल्याचे मला समजले. मात्र मला त्यांना हे सांगायचे आहे की काळजी नका करू मी अजूनही सिंगलच आहे !”

खरंतर किरण गायकवाडची झी मराठी वाहिनीवर नवीन मालिका दाखल होणार होती आणि या मालिकेत त्याच्यासोबत मोनालिसा देखील पात्र साकरणार होती. किरण गायकवाडने हुबलाकचा टीझर इंस्टाग्रामवर शेअर करताना मोनालीसासोबतचा फोटो देखील शेअर केला होता. या जोडीने मुंडावळ्या बांधलेल्या लूकमध्ये ‘टोटल हुबलाक लवकरच..’ असं कॅप्शन देत लग्नाचा फोटो शेअर केला होता. चाहत्यांनीही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. मात्र हा फोटो केवळ त्या मालिकेतील एक सीन असून रियल लाईफमध्ये ‘We Are Just Good Friends’ असे भैय्यासाहेब अर्थात किरण गायकवाडने सांगितले आहे .

अभिनेता किरण यानं फोटो शेअर केल्यानंतर मोनालिसाला देखील अनेकांचे मेसेज, फोन आले. त्यावर तिनं सोशल मीडियावर पोस्ट करून ‘लग्न करायला अजून मी लहान आहे…माझी नवीन मालिका येतेय’ असं स्पष्टीकरण दिलं होत.

डेव्हिड वॉर्नरच्या मुलींचा भन्नाट डान्स व्हायरल, पाहा व्हिडिओ

You might also like