‘भाई : व्यक्ती की वल्ली-२’ चा टिझर प्रदर्शित…..

पु.ल.देशपांडे म्हटले की  साहित्य रसिकांचे मन अभिमानाने फुलून येते. पु.ल.देशपांडेंच्या व्यक्तिमत्त्वाच्या जीवनावर आधारित ‘भाई : व्यक्ती की वल्ली-१’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘फाळकेज् फॅक्टरी’ या निर्मिती संस्थेअंतर्गंत ‘भाई.. व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. हा चित्रपट ४ जानेवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता लवकरच या चित्रपटाचा पुढील भाग आपल्या भेटीला येणार आहे.

पूर्वार्धात तुम्ही पुरूषोत्तम पाहिले, आता उत्तरार्धात पुरूषोत्तमचे पु.ल. देशपांडे कसे झाले, याची झलक घेऊन आलाय ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ च्या उत्तरार्धाचा टीझर तुमच्या भेटीला. चित्रपटाचा भाग २ येतोय. येत्या ८ फेब्रुवारीला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.

महत्वाच्या बातम्या –