भाग्यश्रीच्या पतीला अटक

भाग्यश्रीचा पती हिमालय दासानीला मुंबई पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. मुंबईतल्या लोखंडवाला भागात जुगार अड्डा चालविल्याचा आरोप हिमालयवर आहे.

मुंबईतील अंबोली पोलिसांनी हिमालयला अटक केली असून याप्रकरणी आणखी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी छापेमारी केली होती. या छापेमारीत १५ लोकांना अटक करण्यात आली होती. या तपासात हिमालय दासानीचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणी हिमालय किंवा त्याच्या कुटुंबीयांनी अद्याप कोणते वक्तव्य केले नाही.

 

You might also like