भाई : ‘व्यक्ती की वल्ली 2’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित भाई- व्यक्ती की वल्ली हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. सिनेमागृहात प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा भाग चित्रपटाचा पूर्वार्ध असून त्याच्या उत्तरार्धाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

बाबा आमटे यांना मदत करण्यास गेलेल्या पु.ल. देशपांडे यांच्या भाजीपाल्याचे दुकान समाजकंटकांनी मोडल्यावर …तर एकेकाच्या छातीत गोळ्या घातल्या असत्या हे वक्तव्य या ट्रेलरमध्ये दिसत आहे. तसेच अनेक मिश्कील आणि तिरकस विनोदांची पखरणही यात पाहायला मिळत आहे.

पु लं देशपांडे या व्यक्तिमत्त्वाचं वयाच्या तिशी पलिकडील आयुष्य चित्रपटात अभिनेता विजय केंकरे यांनी साकारले आहे. पुलंचा चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये शंभर टक्के प्रवेश कसा झाला, आणिबाणीच्या काळातील पुलंनी घेतलेल्या भूमिका, बाबा आमटेंच्या ‘आनंदवन’साठी केलेली मदत अशा अनेक घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. हा उत्तरार्ध ८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –