बच्चन कुटुंबाची सून बनण्यापूर्वी करिश्माने ठेवली होती’ हि’ अट

करिश्मा कपूर ९० च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध व गाजलेली अभिनेत्री म्हणून एक आहे. तिचा पहिला चित्रपट प्रेम कैदी होता. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा कोणालाही अंदाज नव्हता कि करिश्माचा जलवा सर्वात जास्त पाहायला मिळेल. या दरम्यान तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यावेळी गोविंदासोबत तिची जोडी खूपच प्रसिद्ध होती.

करिश्माने आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. पण लग्नानंतर तिने बॉलीवूडला निरोप दिला. करिश्माने २००३ मध्ये दिल्लीच्या बिजनेसमॅन संजय कपूरसोबत लग्न केले होते. पण तिचे हे लग्न जास्त काळ नाही टिकले आणि २०१२ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

संजय कपूरच्या अगोदर करिश्माचे लग्न बच्चन कुटुंबामध्ये ठरले होते. अभिषेक बच्चन सोबत तिची एंगेजमेंट देखील झाली होती. पण तेव्हा करिश्मा कपूरने एक अशी अट ठेवली ज्याने सर्व काही बरबाद झाले. करिश्माची अट ऐकताच अभिषेकने तिच्यासोबत एंगेजमेंट तोडण्याचा निर्णय घेतला.

करिश्माने एक अशी गोष्ट सांगितली जी अभिषेकला पसंत आली नाही. करिश्माला लग्नानंतर जॉइंट फॅमिलीमध्ये राहायची इच्छा नव्हती. तिची इच्छा होती कि तीने अभिषेकसोबत वेगळ्या घरामध्ये शिफ्ट व्हावे आणि या गोष्टीसाठी ती अभिषेकवर दबाव देखील बनवत होती. पण कुटुंबियांपासून वेगळे राहणे अभिषेकला मंजूर नव्हते. त्याने करिश्माला खूप समजावले आणि जेव्हा ती समजण्यासाठी तयार नव्हती तेव्हा अभिषेकला हे नाते तोडून टाकणेच उचित वाटले. अभिषेक बच्चनचे आपल्या आई-वडिलांवर खूप प्रेम आहे यामुळे त्याने करिश्माची हि अट मानण्यास नकार दिला.

विमान व कार अपघातात आपले प्राण गमवून बसले ‘हे’ कलाकार