‘मला साजिरी ह्यांच्या पर्सनल ड्रायव्हरची नोकरी मिळून 3 वर्ष झाली’

अमेय वाघ आणि साजिरी देशपांडे यांचा 2017 मध्ये विवाह सोहळा पार पडला. आणि त्यांच्या लग्नसोहळ्याला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमेय वाघने त्याच्या हटके स्टाईलमध्ये पत्निला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्याच्या लग्नाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओसाठी लिहीलेलं कॅप्शन इंटरेस्टिंग आहे. तो लिहीतो की, “आज मला साजिरी ह्यांच्या पर्सनल ड्रायव्हरची नोकरी मिळून ३ वर्ष झाली ! आता आयुष्यभरासाठी मी ड्रायव्हिंग क्रेझी, माझ्या नोकरीप्रदान सोहळ्यातील हे काही क्षण! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मालकिण !” असं म्हणत त्याने पत्निला शुभेच्छा दिल्या आहेत.

You might also like