दाढी हा माझ्या लूकचा एक महत्त्वाचा भाग – यश

सुपरस्टार यशने “केजीएफ  चॅप्टर 1’मधील आपल्या अभिनयामुळे खूपच प्रसिद्धी मिळविली होती. आता चाहते त्याच्या दुस-या चॅप्टरची आतुरतेने वाट पाहत आहेत. केजीएफ चॅप्टर 1 मधील यशच्या जबरदस्त अभिनयाशिवाय दर्शकांना त्याची दाढी आणि लांब केसांचा लुक खूपच आवडला होता, जो 70च्या दशकात अतिशय लोकप्रिय होता.

यशने त्याच्या व्यक्तिरेखेसाठी हा लूक खास करून घेतला होता. पण आता तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनला आहे. एका मुलाखतीत यश म्हणाला, त्याला 4 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. “केजीएफ’मधील दाढी हा माझ्या लुकचा एक महत्त्वाचा भाग होता. कारण यामुळे माझे पात्र रॉकी अधिक इंटेंस झाले होते. पण आता तो माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनला आहे आणि मला ते आवडते. तथापि, दाढी व्यवस्थित ठेवण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते.

परंतु तसे करण्यास मला काहीच हरकत नाही.दरम्यान, “केजीएफ ः चॅप्टर 2’मध्ये यशसोबत अभिनेता संजय दत्त मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोन्ही स्टार्सना पहिल्यांदाच स्क्रीनमध्ये स्पेस शेअर करताना पाहणे मनोरंजक ठरणार आहे. हा चित्रपट 2021मध्ये पडद्यावर येणार असून यशला ऑनस्क्रीन पाहण्यास प्रत्येकजण उत्साही आहे.

You might also like