बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज
मुंबई: अभिनेता वरूण धवन आणि आलिया भट यांचा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. करण जोहरने या सिनेमाची निर्मिती केली असून शशांक खेतान याने लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा एक मसाला फिल्म असून यात देशी तडका विथ रोमान्स बघायला मिळणार आहे.
वरूण धवन आणि आलिया भट हे दोघेही ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या सिनेमात एकत्र बघायला मिळाले होते. याच सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. त्यानंतर ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या सिनेमातही धमाल उडवली होती.