‘कला-क्रीडा’ क्षेत्राचे पुन्हा गठबंधन! बॅडमिंटनपटू ज्वाला ‘या’ साऊथ स्टारबरोबर एंगेज! 

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू आणि कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती ग्लॅमरस ज्वाला गुट्टा तिच्या वाढदिनी अर्थात 7 सप्टेंबरला तामिळ सुपरस्टार विष्णू विशालबरोबर ‘एंगेज’ झाली आहे. ट्विटरवर ही माहिती देताना यापुढील प्रवास हा अत्यंत चांगला असेल, अशी भावना तिने व्यक्त केली. खरेतर, शोबिजमधील एखाद्याला एखाद्या स्पोर्ट्सपर्सनच्या प्रेमात पडताना आपण खूप पूर्वीपासून पहात आहोत. ‘कला-क्रीडा’ क्षेत्राचे हे अनोखे गठबंधन अनेक वर्षांपासून सुरू आहे. चला तर, अशा 5 शोबिज सेलेब्सवर नजर टाकूया ज्यांनी खेळाडूंशी लग्न करून आनंदी आणि सफल आयुष्य जगत आहेत.

1) अनुष्का शर्मा-विराट कोहली :
करमणूक उद्योगातील आघाडीची महिला आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार एकमेकांच्या प्रेमात पडले आणि डिसेंबर 2017 मध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने सर्वांना चकित केले जेव्हा त्यांनी त्यांच्या स्वप्नातील लग्नातील फोटो शेअर केले.  दोघांच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत आणि आता लवकरच ते आई-बाबा बनणार आहेत.

2) लारा दत्ता-महेश भूपती :
माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता टेनिसपटू महेश भूपतीच्या प्रेमात पडली. या दोघांनी 16 फेब्रुवारी 2011 रोजी लग्नगाठ बांधली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत ते आनंदी आयुष्य जगत आहेत. दोघांना एक सुंदर मुलगी आहे, जिचे नाव त्यांनी सायरा ठेवले आहे.

3) हेजल कीच- युवराज सिंग :
बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीच आणि भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगची प्रेमकथा बॉलिवूडच्या रोम-कॉमपेक्षा काही कमी नाही. एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर तिने आपल्या भावना कबूल केल्यावर तब्बल चार वर्षांनी लग्न करायचे ठरविले. युवराज आणि हेजल यांनी 30 नोव्हेंबर 2016 रोजी लग्नगाठ बांधली.

4) गीता बसरा-हरभजनसिंग
29 ऑक्टोबर 2015 रोजी पंजाबमध्ये बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा आणि भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग विवाहबंधनात अडकले. हरभाजनसोबत सतत सावलीसारखी राहून त्याला प्रोत्साहन देणारी, लेखनातून त्याचे कौतुक करणारी गीता ही हरभजनची सामर्थ्यस्तंभ आहे. एकमेकांना पूरक आणि आदर्शवत असे हे जोडपे आहे.

5) शर्मिला टागोर- मन्सूर अली खान पतोडी
अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतोडी यांच्या उल्लेखाशिवाय ही यादी कशी पूर्ण होऊ शकते?  ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर दिग्गज भारतीय क्रिकेटपटू मन्सूर अली खान पटौदी यांच्या प्रेमात पडल्या आणि दोघांनी 27 डिसेंबर, 1969 रोजी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. या क्षेत्रातील सर्वात यशस्वी जोडपे असा या दोघांचा उल्लेख करता येईल.

You might also like