पुन्हा प्रेक्षकांना हसवायला एकत्र येणार बाबूभाई, श्याम आणि राजू

‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ या दोन चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर आता ‘हेराफेरी ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हेराफेरी ३’ चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून मोठी चर्चा होती. परंतु आता ‘हेरा फेरी’चा तिसरा सिक्वेल लवकरच येणाच्या तयारीत आहे. कॉमेडी चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक इंद्र कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. इंद्र कुमार चित्रपटाच्या स्क्रिप्टवर गेल्या मे महिन्यापासून काम करत आहेत. याआधी निर्माते फिरोज आणि अक्षय कुमार यांच्यातील काही वादामुळे चित्रपटाचे काम बंद करण्यात आले होते. परंतु आता पुन्हा यावर काम सुरू करण्यात आले असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like