‘बाबा’ हा चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

संजय दत्तची पावले मराठी आता चित्रपटसृष्टीकडे वळली आहे.  मराठी चित्रपटसृष्टीतील त्याची पहिली निर्मिती असलेला ‘बाबा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

हा चित्रपट संजयने त्याच्या वडीलांना सुनील दत्त यांना समर्पित केला असून या चित्रपटाची निर्मिती संजय एस. दत्त प्रोडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स अंतर्गत करण्यात येत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर. गुप्ता यांनी केले असून संजयने काही दिवसापूर्वी या चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच केले आहे. या पोस्टरमध्ये एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत सायकलवर बसलेला दिसून येत आहे. भावनेला भाषा नसते अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.

 

You might also like