‘बाहुबली 2’ ची रिलीज होण्यापूर्वीच 500 कोटींची कमाई
एस.एम.राजमौली यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘बाहुबली’ या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाने ऎतिहासिक कमाईही केली होती. त्यानंतर याच सिनेमाच्या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. बाहुबली २ या सिनेमाने रिलीज होण्यापूर्वीच रग्गड कमाई केली आहे. ‘बाहुबली २’ ने आतापर्यंत ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. थिएट्रीकल राईट्समधून ही कमाई केल्याची माहिती आहे.
#BaahubaliTheConclusion 's Humongous Pre-release Biz WW.. pic.twitter.com/a3rQhtjnp0
— Ramesh Bala (@rameshlaus) February 1, 2017