१५ वर्षांपूर्वीच्या आयुषमानचा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

आयुषमान खुराना या एका नावातच तुम्हाला सगळे गुण मिळतील. तो उत्तम अभिनेता तर आहेच शिवाय तो उत्तम गायक, गीतकार आणि संगीतकारही आहे. त्याला लिखाणाचीही आवड आहे. अशा या सर्वगुणसंपन्न कलाकाराचा आज वाढदिवस. ‘विकी डोनर’, ‘बधाई हो’, ‘अंधाधून’ यांसारख्या चित्रपटांमुळे चर्चेत आलेल्या आयुषमानवर आता बॉलिवूडचा यशस्वी हिरो म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. वेगळ्या वाटेवरून जाणारा, तथाकथित व्यावसायिक अभिनेत्यांच्या चौकटीत न बसणारा अभिनेता म्हणून त्याचे सध्या कौतुक होत आहे.
गेल्या १५ वर्षांत त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. २००४ मध्ये त्याने एमटीव्ही रोडीज सिझन २चे विजेतेपद पटकावले. तेव्हापासून आतापर्यंत त्याच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे. रोडीजनंतर त्याने काही काळ रेडिओ जॉकी म्हणूनदेखील काम केले. आरजेच्या कामानंतर आयुषमानने व्हिडीओ जॉकी म्हणून काम करण्यास सुरूवात केली. त्याच्या या कामाचेही कौतुक झाले. २०१२ हे वर्ष आयुषमानसाठी महत्त्वाचे ठरले. या वर्षी ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.