…म्हणून आयुषमानने नेसली साडी

सोशल मीडियावर कधी कुठली गोष्ट व्हायरल होईल याचा नेम नसतो. सध्या सोशल मीडियावर ‘#SareeTwitter’ ट्रेंड होत आहे. दरम्यान अनेक जण साडी नेसून त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नुकताच आयुषमान खुरानाने देखील त्याचा साडीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आयुषमानने नुकताच त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे.

या फोटोमध्ये आयुषमानने पांढऱ्या रंगाच्या टिशर्टवर साडी नेसल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या या मजेशीर अंदाजाने अनेकांची मने जिंकली आहेत. आयुषमानने हा फोटो शेअर करत ‘हॅशटॅग साडी ट्विटर’ असे लिहिले आहे.

 

 

You might also like