‘आसूड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अन्यायाविरोधात संघर्षाची ठिणगी पेटवत शेतकऱ्यांच्या हितासाठी एका युवकाचा व्यवस्थेविरोधातला धडाकेबाज लढा दाखवणाऱ्या ‘आसूड’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘आसूड’ हा चित्रपट ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांचे आहे.

विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत,राणा जंगबहादूर, अवतार गील,अमित्रीयान पाटील,रश्मी राजपूत हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

या चित्रपटाची सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथा-पटकथा आणि संवाद निलेश रावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत.

महत्वाच्या बातम्या –

 

अनंत जोगअमित्रीयान पाटीलअवतार गीलउपेंद्र दातेकमलेश सावंतदीपक शिर्केप्रदीप वेलणकरमाधव अभ्यंकररश्मी राजपूतराणा जंगबहादूरविक्रम गोखलेसंदेश जाधव