मानलं तुम्हाला; रितेश व जेनेलिया देशमुखनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : भारतरत्न डॉ. बी. सी. रॉय यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय डॉक्टर दिन हा १ जुलैला साजरा केला जातो. जागतिक डॉक्टर दिनी सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले. पण, अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा देशमुख यांनी यंदाचा डॉक्टर दिन वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला.

रितेश-जेनेलिया यांनी डॉक्टरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. रितेश-जेनेलिया या दोघांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून ही माहिती दिली. रितेश-जेनेलिया यांनी म्हटले की,”जेनेलिया आणि मी याबाबत अनेकदा चर्चा केली. अनेकदा विचार केला. पण, दुर्दैवानं आतापर्यंत बोलू शकलो नव्हतो. पण, आज 1 जुलैला आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की, आम्ही अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्याला आयुष्य देणं यापेक्षा मोठं गिफ्ट असूच शकत नाही. तुम्हालाही तसंच वाटत असेल, तर तुम्हीही पुढाकार घ्या आणि अवयव दान करा.”

कोरोनाची कॉलर ट्यून बंद करा; प्रकाश आंबेडकरांच्या नंतर कॉंग्रेस आमदाराचीही मागणी

यांच्या पुढाकाराचे केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनी कौतुक केलं. त्यांनी लिहिलं की,”रितेश-जेनेलिया यांच्यासारखे युवा कलाकार पुढाकार घेऊन अवयव दान करण्याचा निर्णय घेत असल्याचे पाहून चांगलं वाटत आहे. त्यांच्या या पुढाकारानंतर अनेक जण सामाजिक जाण म्णून पुढाकार घेतील.”

 

You might also like