‘एका स्त्रीचा शाप महागात पडतो’

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे कंगना रणौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक सुरु असल्याचं दिसून येत आहे. यामध्येच बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी बीएमसीने कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई केली.

यामध्येच अशोक पंडित हेदेखील व्यक्त झाले असून त्यांनी कंगनाची पाठराखण केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

“एक स्वप्न उद्धवस्त झालं. देव तिला आणखी बळ आणि शक्ती देवो. एका स्त्रीचा शाप महागात पडतो संजय राऊतजी”, असं ट्विट अशोक पंडित यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर एकच खळबळ उडाली असून अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

You might also like