याकूब मेमनच्या घरावर कारवाई नाही, पण कंगनावर कारवाई -आशिष शेलार

कंगना रनौतच्या ऑफिसचे बांधकाम अनधिकृत होते, तर इतकी वर्ष कारवाई का झाली नाही, याकूब मेमनच्या घरावर कारवाई केली नाही, पण कंगनाला नोटीस दिल्यावर अवघ्या 24 तासात झालेली कारवाई ही सूडबुद्धीने आहे” असा घणाघात भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. “मी आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी” या नवीन योजनेप्रमाणे ठाकरे सरकार काम करत असल्याचा निशाणाही त्यांनी साधला.

“मुंबई महापालिकेचा गौरवशाली इतिहास प्रश्नांकित करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. ठाकरे सरकार अहंकारी आहे. ‘मी आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी’ या नवीन योजनेप्रमाणे ते काम करत आहेत” असा घणाघात त्यांनी केला.

“सुडाच्या भावनेने ही कारवाई होताना दिसत आहे. अनधिकृत बांधकाम थांबवणे ही भाजपची भूमिकाच नाही. पण आमच्या सोबत राहिलात तर कारवाई नाही आणि सोबत नसाल तर कारवाई असा ठाकरे सरकारचा कारभार आहे. कंगनाच्या ऑफिसचे बांधकाम अनधिकृत असेल, तर जशी तत्परता तोडकाम करताना दाखवली, तीच भूमिका इतरांच्या बाबतीतही असायला हवी” असे शेलार म्हणाले.

“ज्या बॉम्बस्फोटच्या साखळीने मुंबई हादरली त्या याकूब मेमनच्या घरात बीएमसी घुसली नाही, याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्या माणसाला पालकमंत्री केलं, ज्यांनी कसबला बिर्याणी खाऊ घातली त्या काँग्रेसला प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही” असेही आशिष शेलार म्हणाले.

You might also like