‘अशी ही आशिकी’चे सोनू निगमच्या आवाजातील पहिले गाणे रिलीज

अभिनय बेर्डेचा आगामी ‘अशी ही आशिकी’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. काही दिवसं पूर्वी ‘अशी ही आशिकी’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटातील सोनू निगमच्या आवाजातील पहिले गाणे आता रिलीज करण्यात आले आहे.

या गाण्याचे बोल ‘रक्कमा’ असे आहेत. ‘रकम्मा’ हे गाणे सोनू निगम यांनी गायले आहे. या चित्रपटातील सगळी गाणी सोनू निगम यांनीच गायली आहेत.

या चित्रपटाची निर्मीती गुलशन कुमार प्रस्तुत, टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार यांनी केली आहे. तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगांवकर हे करत आहेत. या चित्रपटात अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे ही जोडी स्क्रिन शेअर करत आहेत. १४ फेब्रुवारी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like