तक्रार दाखल होताच रिया मुंबईतून नौ दो ग्यारा  

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी हाय प्रोफाईल लोकांची चौकशी करत असल्याचे दिसून येत आहे. असे असताना मात्र दुसरी कडे  सुशांतच्या वडिलांनी त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीच्या विरोधात पाटण्यात तक्रार दाखल केली आहे.

‘केजीएफ चॅप्टर – २’ मधील संजयचा लूक आला समोर

मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा पोलिसांची चार जणांची टीम मुंबईला आली. मात्र  रियाच्या घरी जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा तिच्या राहत्या घरात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आलं. रियाकडून अटकपूर्व जामिनासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचंही म्हटलं जात आहे. तसेच यासाठी तिने अभिनेता  सलमान खान  आणि संजय दत्त यांची केस लढणाऱ्या भारतील प्रसिद्ध वकिलांपैकी एक असलेल्या मानशिंदे यांना नेमलं आहे.

रियाने सुशांतकडून पैसे घेतले होते व तिने संपूर्ण कुटुंबाशी असलेले त्याचे संबंध तोडून टाकले होते. इतकेच नव्हे, तर तिनेच त्याला आत्महत्येला प्रवृत्त केले असा आरोप सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे.

दरम्यान, प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला १ महिना उलटून गेला आहे. या प्रकरणी अनेक बड्या लोकांच्या चौकश्या आतापर्यंत करण्यात आल्या असून आता दिग्दर्शक महेश भट आणि करण जोहर यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले.

कोरोनाची लस सापडत नसल्यामुळे रडू लागले अनुपम खेर१४ जूनला सुशांतच्या अचानक जाण्याने अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. तर, त्याला अनेक वेळा बॉलिवूडमध्ये डावलल्याने त्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता असल्याचे आरोप अभिनेत्री कंगना राणावत ने केल्यानंतर चाहत्यांनी महेश भट व करण जोहर यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. यानंतर आता त्यांची चौकशी साठी बोलावण्यात येत असल्याने महत्वाच्या बाबी समोर येऊ शकतात, असे अंदाज बांधले जात आहेत.

 

You might also like