अर्शद वारसीलाही वाढीव वीज बिलाचा फटका….!

सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना वाढत्या वीजबिलाचा फटका बसला आहे. यात तापसी पन्नू, रेणुका शहाणे,हुमा कुरेशी या अभिनेत्रींनंतर आता ‘सर्किट’ म्हणजेच अर्शद वारसीला देखील वाढत्या बिलाचा फटका बसला आहे. याविषयी त्याने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली होती. मात्र त्यानंतर त्याची समस्या दूर झाली असून याविषयी त्याने ट्विट करत माहिती दिली.अर्शदने ट्विट करुन समस्या दूर झाली असून सहकार्य केल्याबद्दल आभार असं म्हटलं आहे.

अर्शद वारसी याला एका महिन्यात तब्बल १ लाख ३ हजार ५६४ रुपये बील आलं होतं. बिलावरील आकडे पाहिल्यानंतर त्याने ‘हायवे लुटारु’ अदानी यांच्याकडून आलेलं हे माझे वीज बील असं म्हणत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’ने रोखठोक शब्दात अर्शदला उत्तर दिलं होतं.

“वाढीव बील आल्यामुळे आम्ही तुमची चिंता समजू शकतो, याप्रकरणी आम्ही तुमची मदतही करण्यास तयार तत्पर आहोत. मात्र वैयक्तिक बदनामी करणारी टीका सहन करणार नाही”, असं प्रत्युत्तर अदानी इलेक्ट्रिसिटीकडून अर्शदला देण्यात आलं होतं.

त्यानंतर अदानी इलेक्ट्रिसिटीने अर्शदची समस्या सोडविली असून अर्शदने पुन्हा एक नवीन ट्विट शेअर करत समस्या दूर झाल्याचं म्हटलं आहे.

You might also like