बच्चन कुटुंबात नव्या पाहुण्यांचे आगमन

बच्चन कुटुंबियांनी काही आठवड्यांपूर्वीच एक मर्सिडीज कार खरेदी केली होती. आता पुन्हा एकदा बच्चन कुटुंबियांनी मर्सिडीज खरेदी केली आहे. सध्या सोशल मीडियावर या कारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी अमिताभ बच्चन यांना ट्रोल केलं आहे.
प्राप्त माहितीनुसार ही मर्सिडीज बेंझ जीएलएस 2020 गाडी आहे. ही कार याच वर्षी भारतात लाँच करण्यात आली होती. बच्चन कुटुंबियांनी खरेदी केलेली ही कार 99.90 लाख रुपये आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांनीकाही आठवड्यांपूर्वीच एक महागडी कार खरेदी केली होती.
दरम्यान, महिनाभराच्या काळावधीमध्ये बच्चन कुटुंबियांनी दोन महागड्या कार खरेदी केल्याने नेटीझन्सनी अमिताभ यांच्यावर टीका केली आहे. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अभिनेत्याकडून आम्हाला हे अपेक्षित नव्हतं.
एकिकडे सोनू सूद कोरोना काळात अनेक गरजूंना मदत करतो आहे आणि दुसरीकडे अमिताभ बच्चन कोट्यवधींची कार खरेदी करत आहेत. अमिताभ यांनी सोनू सूदकडून काहीतरी शिकावं. इतका पैसा गाडीवर खर्च करण्यापेक्षा लोकांना दान करावं. त्यांची मदत करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया एका नेटीझन्सनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:-