‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये आगामी भागात होणार दिशाची एण्ट्री ?

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लॉकडाउननंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेचे नवे एपिसोड पुन्हा पाहायला मिळत असल्यामुळे चाहते आनंदी असल्याचे दिसत आहे. ही मालिका टीआरपीच्या यादीमध्ये देखील टॉपमध्ये असते.

आता मालिकेमध्ये पुन्हा दया बेन म्हणजेच दिशा वकानीची एण्ट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे.आगामी भागात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या स्पेशल भागात दिशा वकानीची पुन्हा मालिकेत एण्ट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे.

त्यामुळे चाहते आनंदी असल्याचे दिसत आहे. पण सुरु असेलेल्या या चर्चांवर निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.यापूर्वी मालिके काम करणाऱ्या जेनिफरने दिशा वकानीची पुन्हा मालिकेत एण्ट्री होऊ शकते असे म्हटले होते. पण सध्या दिशा तिच्या मुलीकडे लक्ष देत आहे. त्यामुळे मालिकेत येण्यासाठी तिच्यावर दबाव टाकणे चुकीचे ठरेल असे म्हटले होते. गेल्या २ वर्षांपासून चाहते दिशाला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

You might also like