‘अर्जुन रेड्डी’नंतर विजय देवरकोंडाच्या ‘या’ चित्रपटाचा येणार हिंदी रिमेक

‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’ हा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने ‘अर्जुन रेड्डी’ प्रमाणेच प्रेक्षकांची लोकप्रियता मिळविली. आता ‘कबीर सिंग’नंतर आणखी एका दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात येणार आहे. चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने या हिंदी चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत.

विजय देवरकोंडा याचा आगामी ‘डिअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शक करण जोहरने या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे हक्क विकत घेतले आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटच्या माध्यातून ही माहिती दिली आहे.

दरम्यान, ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटाची घोषणा झाली असून या चित्रपटामध्ये नक्की कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हे निश्चित करण्यात आलेलं नाही.