अर्जुन रामपालने शेअर केला मुलासोबतचा खास फोटो

अर्जुन रामपाल गेल्या काही दिवसांपासून त्याच्या रिलेशसनशीपमुळे चर्चेत होता. १७ जुलै रोजी गॅब्रएलाला पूत्ररत्न झाला. अर्जुन आणि त्याचे संपूर्ण कुटुंब नव्या पाहुण्याच्या येण्याने फार आनंदी असल्याचे दिसत आहे.
अर्जुनने नुकताच त्याच्या बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने मुलाचा हात पकडला आहे. फोटो शेअर करत त्याने ‘Ufffff….’ असे लिहिले आहे. गॅब्रएलाने देखील हाच फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.