हा अभिनेता तिसऱ्यांदा झाला बाबा

अर्जुन रामपालने काही दिवसांपूर्वी त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला ही प्रेग्नंट असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर त्यांच्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाल्या. इतकंच नाही तर बेबी शॉवरचे फोटो देखील सोशल मीडियावर पहायला मिळाले होते.
त्यानंतर आता अर्जुन रामपाल बाबा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अर्जुनला पूत्र रत्न झाल्याचे समोर आले आहे. अर्जुनच्या दोन्ही मुली देखील नव्या पाहुण्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या आहेत. अर्जुनचे संपूर्ण कुटुंब नव्या पाहुण्याच्या येण्याने आनंदी असल्याचं म्हटले जात आहे.