‘स्वदेशी’चा नारा महात्मा गांधींनी दिला होता तो आपण विसरतोय का ?

लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेली हिंसक झटापटीत भारताचे  20 जवान शहीद झाले. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वाढलेला तणाव, चीनची मुजोरी या पार्श्वभूमीवर ड्रॅगनला हिसका दाखवण्याची मागणी देशवासीयांकडून होतेय.  चिनी वस्तू न वापरण्याचं आवाहन वेगवेगळ्या माध्यमांमधून करण्यात येतंय.

चीनच्या कारस्थानाला आपण बुलेट आणि वॉलेट अशा दोन्ही माध्यमातून प्रत्युत्तर दिलं पाहिजे, असं मत रिअल लाईफमधील फुन्सूक वांगडू – अर्थात शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ सोनम वांगचूक यांनी व्यक्त केलं आहे. त्याला अनेकांनी पाठिंबाही दिला आहे. त्यात आता कंगना राणावतनंही ‘एन्ट्री’ घेतलीय. कंगनाने या संदर्भात इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ  पोस्ट केला आहे. कंगनाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

You might also like